दि. १८.०२.२०२३
बोधी बुडोकान कराटे महाराष्ट्र राज्य धामणगाव रेल्वे चे विद्यार्थिनी चे घवघवीत यश
राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत कू. ईश्वरी चंद्रशेखर कडू हिने द्वितीय क्रमांक (रोप्य पदक) मिळून यश प्राप्त केली.
प्रतिनिधी/अमरावती :
धामणगाव रेल्वे : क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे महाराष्ट्र असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय शालेय स्पर्धा कराटे स्पर्धा १३ ते १६ फेब्रुवारी २०२३ रोजी बारामती येथे संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये १४ व १७ वर्षाखाली कुमारी ईश्वरी चंद्रशेखर कडू वर्ग ९ वा श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालय विद्यार्थि नी धामणगाव रेल्वे, द्वितीय क्रमांक रोप्य पदक मिळून यश प्राप्त केली. तसेच बोधी बुडोकॉन कराटे ची विद्यार्थिनी ईश्वरीने या सगळे यशाचे श्रेय.आई बाबा व सौ. मुख्याध्यापिका सुनीता देशपांडे उपमुख्याध्यापक श्री बाळू राठोड .कु. रजनी टेंभुर्णी. क्रीडाशिक्षक श्रीमती. उगले मॅडम. व चव्हाण सर व कराटे चे प्रशिक्षक सचिन मून सर व सर्व बोधी बुडोकान कराटेचे मास्टर्स व सर्व पदाधिकारीयांनी अभिंदन केले.