दि. १७.०२.२०२३
Vidarbha News India - VNI
Shivsena Symbol : एकनाथ शिंदे शिवसेना भवनावर दावा करणार? ठाकरे म्हणाले...
विदर्भ न्यूज इंडिया
मुबंई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आज अखेर धनुष्यबाण चिन्हासहीत शिवसेना असं नाव देखील मिळालं आहे. निवडणूक आयोगाने अखेर हा निर्णय दिला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय राजकीय वर्तुळात तुफान खळबळ माजली आहे.
उद्धव ठाकरेंना आयोगाने दिलेला हा जोरदार दणका मानला जात आहे. यावर आता उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ठाकरे म्हणाले, "धनुष्यबाण काढून घेतला. उद्या मशाल देखील काढून घेतील. मात्र शिवसैनिकांनी खचू नका. आपण पुन्हा लढू. अंधेरी पूर्व निवडणुकीत आपण दाखवून दिलं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आता शिंदे गट शिवसेना भवनावर दावा करणार? या प्रश्नावर ठाकरे म्हणाले ,शिवसेना भवनावर दावा सांगायला मोगलाई लागली का?
"आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित आहे. लोकशाहीसाठी घातक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहीर करून टाकावं की ७५ वर्षातं स्वातंत्र्य संपल, आता बेबंदशाहीला आम्ही सुरुवात करत. निवडणूक आयोगाचं बोलायचं झालं तर निवडणूक आयुक्त नेमण्यावरच प्रश्नचिन्ह आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा अत्यंत तीव्र शब्दांत समाचार घेतला. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी कागदपत्रांबाबत फक्त थोतांडपणा केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
ठाकरे म्हणाले, "गेल्या काही दिवसापासून निवडणूक आयुक्तांनी केलेले थोतांड खूप भयानक आहे. प्रथम त्यांनी पदाधिकाऱ्यांची लेखी शपथपत्र मागितली. ते आम्ही दिले. लाखांमध्ये सदस्यांचे अर्जही दिले. मागितलेली सर्व कागदपत्रे त्यांच्या सूचनेनुसार जमा केली. आजचा निकाल देऊन त्यांना करायचं होतं तेच केलं. मग कशाला आम्हाला एवढा मोठा खटाटोप करायला सांगितला?"