Today Cryptocurrency Price: जाणून घ्या, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर क्रिप्टोकरन्सीच्या किमती - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Today Cryptocurrency Price: जाणून घ्या, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर क्रिप्टोकरन्सीच्या किमती

दि. 2 फेब्रुवारी 2023

Vidarbha News India - VNI

Today Cryptocurrency Price: जाणून घ्या, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर क्रिप्टोकरन्सीच्या किमती

विदर्भ न्यूज इंडिया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2023-24 साठीचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणार आहे, अशी माहिती दिली.

त्याबरोबर या अर्थसंकल्पात कर्ज, करात सवलत, शेतकरी, व्यावसायिक, महागाई अशा महत्वाच्या क्षेत्रांविषयी घोषणा करण्यात आल्या. तर क्रिप्टोकरन्सीच्या दरावर काय परिणाम झाले ते पाहू.

2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि कार्यक्षम चलन व्यवस्थापनासाठी आरबीआय चालू आर्थिक वर्षात डिजिटल चलन सादर करेल. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. त्याची किंमत सुमारे 439.77 दशलक्ष डॉलर होती. त्याचे वर्चस्व सुमारे 42.32 टक्के होते. यात दिवसभरात 0.16 टक्क्यांनी घट झाली. आज बीटकॉइनची किंमत 19,23,818 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,33,386 रूपये आहे. बायनान्सची किंमत 25,916 रूपये आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये बिटकॉइन व्हॉल्यूम अंदाजे 26.77 दशलक्ष डॉलर होते, गेल्या 24 तासात 4.12 टक्क्यांनी वाढले.

क्रिप्टोकरन्सी किंमती

बीटकॉइन इथेरिअमची किंमत व्यवहार गोपनीय: आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी सशक्त क्रिप्टोग्राफी वापरते. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे. हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. या चलनावर कोणत्याही देशाची किवा कंपनीची मक्तेदारी नाही.

इथेरिअम: 2015 मध्ये एथेरिअम तयार करण्यात आले. एथेरिअम हे एक प्रकारचे क्रिप्टोकरन्सी आहे. जो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित मुक्त स्रोत मंच आहे. इतर ब्लॉकचेन्स प्रमाणेच, एथेरिअमचे एथेर नावाचे मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. ईटीएच हे डिजिटल पैसे आहेत. जर बिटकॉइनबद्दल ऐकले तर एथेरिअममध्ये बर्‍याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे पूर्णपणे डिजिटल आहे आणि जगात कोणालाही त्वरित पाठवले जाऊ शकते. एथेरिअमचा पुरवठा कोणत्याही सरकार किंवा कंपनीद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित आहे. जगभरातील लोक एथेरिअमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी करतात.

रोलर कोस्टर राइड: 2009 मध्ये जेव्हा बिटकॉइन लाँच करण्यात आले तेव्हा त्याची किंमत 0.060 रुपये होती. म्हणजे 10 पैशांपेक्षा कमी आणि आज बिटकॉइनची किंमत 14 लाखांच्या आसपास आहे. एवढेच नाही तर ही क्रिप्टोकरन्सी ५० लाख रुपयांच्या आकड्याला स्पर्श करून परतली आहे. आता तुम्ही स्वतःच कल्पना करू शकता की रोलर कोस्टर राइड बिटकॉइनने या 14 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना किती दिला आहे. पुढील काळात व्यवहारांमध्ये, गुंतवणूकीत क्रिप्टोचलनाचा मोठा बोलबोला असण्याची शक्यता आहे.


Share News

copylock

Post Top Ad

-->