दि. ०९ फेब्रुवारी २०२३
गोंडवाना विद्यापीठात आविष्कार, स्पोर्ट आणि सांस्कृतिक महोत्सव शिखर २०२२-२३
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर
शैक्षणिक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आविष्कार ,खेळ आणि सांस्कृतिक महोत्सव- शिखर २०२२-२३ चे आयोजन १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वा विद्यापीठ परीसरात करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या अध्यक्ष स्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होतील
अविष्कार (पोस्टर आणि पीपीटी प्रेझेंटेशन) ,एकल आणि समूह गीत गायन, मिमिक्री, समूहनृत्य, फॅशन शो... इत्यादी स्पर्धा होतील.