दि. ०९ फेब्रुवारी २०२३
Vidarbha News India - VNI
पालकांनी आपल्या बालकांच्या आरोग्याप्रती जागरूक राहावे ; आ. डॉ. देवरावजी होळी
० ते १८ वर्षांपर्यंतची बालके व किशोरवयीन मुलामुलींनी लसिकरणात सहभागी होण्याचे केले आवाहन
चामोर्शी येथे जागरूक पालक सुदृढ बालक या अभियानाचे आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उद्घाटन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली / चामोर्शी : आपल्या मुलांच्या आरोग्य विषयी पालक जागरूक राहिल्यास बालकांना होणारे आजार टाळता येतात त्यामुळे बालक सुदृढ राहते म्हणूनच पालक जागरूक तर बालक सुदृढ असे म्हटले जाते. म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या बालकाच्या आरोग्य प्रती जागरूक राहावे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जागरूक पालक सुदृढ बालक या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ. प्रफुल् हुलके तालुका आरोग्य अधिकारी चामोर्शी यांचे सह अविनाशजी तालापल्लीवार, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख, सुरेशजी शाह, साईनाथ बुरांडे, डॉ.गणे वैद्यकीय अधिक्षक, गोहन सुटले, गोविंदा कडस्कर, मिलाली रामटेक, पुरुषोत्तम घ्यार, प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र शाळा चामोर्शी येथे ० ते १८ वर्षांपर्यंतची बालके व किशोरवयीन मुलामुलींचे तपासणी अभियान घेण्यात आले. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी बालकांच्या सुदृढ भविष्यासाठी लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या बालकांचे योग्य त्या वेळेमध्ये लसीकरण केले पाहिजे .त्यांच्या वेळोवेळी योग्य त्या आरोग्य तपासण्या केल्या पाहिजेत. जोपर्यंत पालक या संदर्भात जागरूक राहणार नाही तोपर्यंत बालकही सुदृढ होणार नाही त्यामुळे पालकांनी आपल्या बालकांच्या आरोग्य प्रति नेहमीच जागृत राहावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.