दि. ०९ फेब्रुवारी २०२३
गोंडवाना विद्यापीठात उद्या- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर दृष्टिक्षेप या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या आंबेडकर विचारधारा केंद्रा व्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर दृष्टिक्षेप.. या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम १० फेब्रुवारी रोजी १०.३० वा. विद्यापीठ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, मुख्य अतिथी म्हणून प्र-कुलगुरू,डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, विद्यापीठ, औरंगाबाद डॉ. उमेश बगाडे यांची उपस्थिती लाभणार आहे.
या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ.आंबेडकर विचारधारा केंद्राच्या समन्वयक प्रा.डॉ. प्रीती पाटील यांनी केले आहे.