दि. १५.०२.२०२३
गोंडवाना विद्यापीठात संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी
संताच्या आचरणातील एक तरी गुण आपल्या अंगी बाळगावा ; कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : संतांचे नाव समाजाच्या अंतरंगात खोलवर दडलेले असते.कोणी त्यांची निस्वार्थ सेवा केली तर कोणी त्यांच्या आदर्शावर चालून समाजाला दिशा दिली. एक दिवस स्मरण करून त्यांचे आदर्श विसरून जाणे हे बरे नाही. प्रत्येकाने हा विचार करून त्यांचे चरित्र वाचून त्यांच्यातला एक तरी गुण आपल्या अंगी बाळगावा असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी श्री.सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त केले.
यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. श्री सेवालाल महारांजाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, संचालक परीक्षा व मूल्यमापन डॉ.अनिल चिताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रा. डॉ.नंदकिशोर मने यांनी केले.
या कार्यक्रमाला शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांची उपस्थिती होती.