दि. ८ फेब्रुवारी २०२३
इंटरनेट चा वापर करतांना युवकांनी सुरक्षितता बाळगायला हवी; डॉ. प्रीती पाटील
गडचिरोली : इंटरनेटच्या माध्यमातून जग जसं आपल्या मुठीत आलं आहे तसा त्याचा धोकाही वाढला आहे. त्याचा वापर करताना सुरक्षिततेच्या खबरदारी घेण्यात आल्या नाहीत तर आपल्याला आर्थिक आणि मानसिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना आपण सुरक्षितता बाळगायला हवी. असे प्रतिपादन समाजशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ. प्रीती पाटील यांनी केले.
निम्म्याहून अधिक काम आपण ऑनलाईन करत आहोत. तसेच आपली बहुतांश आर्थिक कामे ऑनलाईन होत आहेत. अशा परिस्थितीत ते सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. असे ही त्या म्हणाल्या. गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने च्या वतीने विद्यापीठात सुरक्षित इंटरनेट दिवस कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद जावरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचा लाभ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकानी घेतला.