भारतातील 'या' गावात हिंदू-मुस्लिम सगळ्याचं एकच आडनाव, यामागचं कारण! बघा सविस्तर ... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

भारतातील 'या' गावात हिंदू-मुस्लिम सगळ्याचं एकच आडनाव, यामागचं कारण! बघा सविस्तर ...

दि. ६ फेब्रुवारी २०२३

Vidarbha News India - VNI

भारतातील 'या' गावात हिंदू-मुस्लिम सगळ्याचं एकच आडनाव, यामागचं कारण! बघा सविस्तर...

विदर्भ न्यूज इंडिया 

नालंदा : बिहारमधील असं एक गाव आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. हे गाव नालंदा जिल्हा मुख्यालयापासून 12 किमी अंतरावर अस्तवन ब्लॉकमध्ये आहे.

या गावातील लोकांचे आडनाव एकच आहे. मग ती व्यक्ती हिंदू असोत किंवा मग मुस्लिम किंवा मग त्यांची कोणतीही जात असो. सगळेच लोक एकाच आडनावाने ओळखले जातात. यागावाबद्दल जाणून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे.

हे कसं शक्य आहे? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. या गावातील सगळ्याच लोकांचे आडनाव 'गीलानी' असं आहे. या आगळ्या-वेगळ्या गोष्टीवर भारतातच नाही तर देशाच्या इतर भागातही या गावाची वेगळी ओळख आहे.

तसेच या गावातील अंब्याला देखील जगभरातून ओळख आहे. कारण त्याला परदेशातूनही मागणी आहे.

या गावातील ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. ज्याचे पालन आजही लोक करत आहेत.

आता तर तरुणांनाही गावाचे नाव स्वतःशी जोडण्यात अभिमान वाटतो. त्याचं गाव आणि मातीवर प्रेम आहे. अनेक लोक आहेत जे अनेक दशकांपासून इतर राज्यात राहतात. परंतू तरीही त्यांनी गावाची साथ सोडलेली नाही.

आडनावावरून गाव ओळखले जाते गिलानी गावातील लोक त्यांच्या नावाला गिलानी जोडतात. त्याचप्रमाणे येथील अस्थवान गावची लोक अस्थानवी, हरगव्हाणची लोक हरगणवी, डुमरावनची लोक डुमरनवी, उगवनचे लोक उगनवी, असं आपलं आडनाव वापरतात. या सर्वांमध्ये गिलानी सर्वात खास आहेत. ही परंपरा हिंदू असोत किंवा मुस्लिम सगळेच लोक पाळत आहेत.

गावातील विपिन आणि सलमान अस्थानवी यांच्या मते ही परंपरा मुघल काळापासून सुरू आहे. इस्लाम धर्माचे अनुयायी हजरत अब्दुल कादिर जिलानी यांच्या नावावरून 'गिलानी' हे नाव ठेवण्यात आल्याचे मानले जाते. अरबी भाषेत 'ग' अक्षर नाही, म्हणून लोक त्यांना जिलानी म्हणतात. त्यामुळे गावाचे पूर्ण नाव मोहिउद्दीनपूर गिलानी आहे.

मौलाना मुझफ्फर गिलानी यांच्या 'माझमीन' या पुस्तकानुसार गिलान हे एका ठिकाणाचे नाव आहे. जिथे बडे पीरचे अनुयायी राहत असत. तेथून काही लोक काही कामानिमित्त मोहिउद्दीनपूर गिलानी येथे आले होते. त्या लोकांच्या आडनावातही गिलानी वापरण्यात आले. इथल्या त्या लोकांचा प्रभाव आणि परस्पर सामंजस्य पाहून लोक आपल्या आडनावात गावाचे नाव ठेवू लागले.

Share News

copylock

Post Top Ad

-->