Vidarbha News India - VNI
Lok Sabha Election 2024: लोकसभेत काँग्रेसला कमबॅक करायचंय? एक तडजोड या ७ जागांवर चमत्कार घडवू शकतो
विदर्भ न्यूज इंडिया
Congress,BJP, Party News :
मुबंई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीचा धक्कादायक असा पराभव झाला. काँग्रेसला राज्यात खातं उघडण्यासाठी शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवाराने मदत केली.
२०१९ मध्ये महाराष्ट्र जवळपास काँग्रेसमुक्त झाला. काँग्रेसच्या या अपयशामागे बरीच कारणे आहेत.मात्र वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेतल्याने काँग्रेससह राष्ट्रवादीला देखील जबर धक्का बसल्याचं चित्र पाहिला मिळालं.
२०१९ लोकसभेच्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप मिळून युतीचे एकूण 41 खासदार निवडून आले. तर राष्ट्रवादीचे 4, युवा स्वाभिमानी पक्षाचा एक आणि काँग्रेसचा एक, एमआयएमचा एक, उमेदवार निवडून आला.
हा निकाल काँग्रस-राष्ट्रवादीला धक्का होता. मात्र हा धक्का दिला तो प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने.
नांदेड, सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलडाणा, हातकणंगले या सात लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा निसटता पराभूत झाला.
काँग्रेसच्या लोकसभा मतदार संघात वंचितने आघाडी घेतली
सांगली
विजयी - संजयकाका पाटील (भाजप) - 5 लाख 08 हजार 995
पराभूत - विशाल प्रकाशबापू पाटील (स्वाभिमानी + काँग्रेस) - 3 लाख 44 हजार 643
वंचितची मते - गोपीचंद पडळकर (वंबआ) - 3 लाख 00234
बुलढाणा
विजयी - प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना) - 5 लाख 21 हजार 977
पराभूत - डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगे (काँग्रेस) - 3 लाख 88 हजार 690
वंचितची मते - बळीराम सिरस्कार (वंबआ) - 1 लाख 72 हजार 627
नांदेड
विजयी - प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) - 4 लाख 86 हजार 806
पराभूत - अशोक शंकरराव चव्हाण (काँग्रेस) - 4 लाख 46 हजार 658
वंचितची मते - यशपाल भिंगे (वंबआ) - 1 लाख 66 हजार 196
परभणी
विजयी - संजय हरिभाऊ जाधव (भाजप)- 5 लाख 38 हजार 941
पराभूत - राजेश उत्तमराव विटेकर (काँग्रेस) - 4 लाख 96 हजार 742
वंचितची मते - आलमगीर खान (वंबआ) - 1 लाख 49 हजार 946
हातकणंगले
विजयी - धैर्यशील संभाजीराव माने (शिवसेना) - 5 लाख 85 हजार 776
पराभूत - राजू शेट्टी (स्वाभिमानी+काँग्रेस) - 4 लाख 89 हजार 737
वंचितची मते - अस्लाम सय्यद (वंबआ) - 1 लाख 23 हजार 419
गडचिरोली-चिमूर
विजयी - अशोक महादेवराव नेते (भाजप) - 5 लाख 19 हजार 968
पराभूत - डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी (काँग्रेस) - 4 लाख 42 हजार 442
वंचितची मते - रमेश गजबे (वंबआ) - 1 लाख 11 हजार 468
सोलापूर
विजयी - डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (भाजप) - 5 लाख 24 हजार 985
पराभूत - सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) - 3 लाख 66 हजार 377
वंचितची मते - बाळासाहेब आंबेडकर (वंबआ) - 1 लाख 70 हजार 7
त्यामुळे भाजप-शिवसेनेला मोठा फायदा झाला आणि आता त्याच निकालावर भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मिशन ४५ ची घोषणा केली आहे.
त्यासाठी थेट केंद्रातूनच सुत्र फिरत आहे. मिशन ४५ म्हणजे येत्या २०२४ ला महाराष्ट्रातून भाजपचे एकूण ४५ खासदार लोकसभेवर निवडून गेले पाहिजेत.
असा मानस भाजपचा आहे, त्या दृष्टीने भाजप मैदानात उतरली आहे.
मात्र आता भाजपला मिशन ४५ अंतर्गत ४५ खासदार मिळवता येतील याची जरा शंकाच, कारण ज्या आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला तोच पक्ष आता मविआ म्हणजेत राज्यातील सर्वात मोठ्या आघाडीमध्ये सामिल होण्याच्या तयारीत आहे.
एकीकडे वंचितने-शिवसेनेसोबत आघाडी केली आहे. अन् शिवसेनेची-काँग्रेस-राष्ट्रवादी या प्रमुख राजकीय पक्षाशी आघाडी आहे.
आज ना उद्या जर शिवसेनेची-काँग्रेस-राष्ट्रवादी-वंचित आघाडी राज्यात उदयास आली तर शिंदे गटासह भाजपचा सुपडासाफ होण्याची शक्याता आहे. आणि सर्वाधिक फायदा हा काँग्रेसला होण्याची शक्याता आहे. त्यामुळे काँग्रेसने वंचितशी जुळवून घेण्यातच भलं असल्याचे जेष्ठ पत्रकाराचं मत आहे.