दि. १५.०२.२०२३
अखेर चामोर्शी येथील बस स्थानकाच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध; आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश
चर्चा पत्रव्यवहार भेटीसह विधानसभेतही उचलून धरला होता मुद्दा
चामोर्शी वासीयांनी केले आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे अभिनंदन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोशी : बस स्थानकाच्या बांधकामाचा प्रश्न अखेर निकाली लागला असून या बस स्थानकाच्या २ कोटी १५ लक्ष ६४ हजार ३८९ रुपयाच्या बांधकामाची निविदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे आता लवकरच चामोर्शी वासियांसाठी बस स्थानकाचे बांधकाम पूर्णत्वास येणार आहे. याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे.
आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या बस स्थानकाच्या निर्मितीसाठी सुरुवातीपासूनच अथक मेहनत घेतली. निवेदन, चर्चा नियमित पाठपुरावा, जागेची उपलब्धता, सातत्याने वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे, मुंबईला मंत्री महोदयांच्या भेटी, विधानसभेत प्रश्न मांडून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून या बांधकामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे लवकरच चामोर्शीच्या बस स्थानकाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. याबद्दल आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांचे आभार मानले तर चामोर्शी वासीयांनी केले आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांचे अभिनंदन केले आहे.