दि.१६.०२.२३
राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर शैक्षणिक विभाग गोडवाना विद्यापीठाच्या वार्षिक विशेष शिबिराला सुरुवात
गडचिरोली : गोडंवाना विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष वार्षिक शिबिरची सुरुवात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र, शाळा मुरखळा, गडचिरोली येथे नुकतीच झाली. उद्घाटन कार्यक्रम संचालक, राष्ट्रीय सेवा योजना गोंडवाना विद्यापीठ डॉ.श्याम खंडारे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जगदीश चौधरी, मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बी. एम घोडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.श्याम खंडारे यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व सांगत ,महात्मा गांधी यांच्या श्रमदानाबद्दलच्या विचारांवर प्रकाश टाकला. सरपंच दशरथ चांदेकर यांनीही या शिबीर मोहीमेची कल्पना कशी आदर्श ठरू शकते. याबद्दल आपले विचार व्यक्त केले. या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी शाळेतील विद्यार्थ्यांसह गावातून स्वच्छता आणि व्यसन महत्त्वाच्या मुद्द्यांवर घोषणा देत रॅली काढली. शाळेचे मुख्याध्यापक बी.एम घोडाम यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना शुभेच्छा देत शिबिरासाठी प्रोत्साहीत केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद जावरे यांनी प्रास्ताविक तर सहकार्यक्रम अधिकारी डॉ. वैभव मसराम यांनी आभार मानले.