गाव पाणीदार करा आणि 10 लाख रूपयांचा निधी मिळवा, पालकमंत्र्यांचे आवाहन...वाचा सविस्तर बातमी... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गाव पाणीदार करा आणि 10 लाख रूपयांचा निधी मिळवा, पालकमंत्र्यांचे आवाहन...वाचा सविस्तर बातमी...

दि.२५.०२.२०२३

                           Media - VNI

गाव पाणीदार करा आणि 10 लाख रूपयांचा निधी मिळवा, नाशिकच्या पालकमंत्र्यांचे आवाहन

VNI : Nashik News : 

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेचा (Nashik ZP) मिशन भगीरथ प्रयास उपक्रमातून जिल्ह्यातील दुष्काळी गावे भविष्यात निश्चितच पाणीदार होतील असा विश्वास व्यक्त करीत लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करावा.

त्याचप्रमाणे या उपक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना (Grampanchayat) शासनाच्या निधीसोबतच 10 लाख रूपयांचा अतिरिक्त निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

नाशिक शहरातील (Nashik) गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषद नाशिकतर्फे आयोजित मिशन भगीरथ प्रयास (Mission Bhagiarth Prayas) उपक्रम कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले, मिशन भगीरथ प्रयास उपक्रमातून पिण्याच्या पाण्यासोबतच, शेती व सिंचनाचा प्रश्नमार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच मनरेगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार असून दुष्काळ काळात होणारे गावकऱ्यांचे स्थलांतर थांबणार आहे. लोकांनी स्वत:च्या गावाच्या विकासासाठी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्यास गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. लोकसहभागातून काम करतांना गावातील जेष्ठ मंडळीचे अनुभव व मार्गदर्शन पूरक ठरणार असून त्यांच्या मार्गदर्शनातून पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची जागा निश्चित करण्यात यावी, असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री दादा भुसे पुढे म्हणाले, आज जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी समर्पित भावनेतून कोणताही शासनाचा निधी न घेता केलेल्या कार्यातून राजस्थानमधील गावांचे चित्र बदलले आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन व प्रेरणा जर नाशिक जिल्ह्यास लाभली तर निश्चितच मिशन भगीरथ प्रयास उपक्रम यशस्वी होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावपातळीवर महिला सरपंच यांचा सहभाग वाढला पाहिजे, अशी आशाही पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत साधारण 200 गावांतून 705 कामांचे नियोजन करण्यात आले असून या कामांसाठी शासनाकडून निधीची उपलब्धता करण्यात येणार आहे. गावांतील नागरिकांनी या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभागी होवून उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केले.

पाणीसाठा वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात

नाशिक जिल्हा परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेला मिशन भगीरथी उपक्रम स्थुत्य असून शाश्वत प्रयत्नातून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी यावेळी केले. भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यााठी भूगर्भाचा अभ्यास, संशोधन करणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त आहे, योग्यस्थळे निश्चित करून भूगर्भात या पाण्याची साठवण झाल्यास गावागावातील पाणीप्रश्न सुटून उन्हाळ्यातील टँकर्सची संख्या कमी होऊन मिशन भागीरथ प्रयास यशस्वी होईल, असा विश्वासही यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

Author : गोकुळ पवार

Share News

copylock

Post Top Ad

-->