दि.२१.०२.२०२३
Vidarbha News India - VNI
नक्षल्यांनी लपवून ठेवलेल्या 2 रायफली जप्त
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : पेंढरी उपविभागांतर्गत येत असलेल्या Naxalites seiz जारावंडी पोलिस ठाणे हद्दीतील जंगल परिसरात आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या 2 रायफली हस्तगत करण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. टीसीओसी कालावधीत Naxalites seiz नक्षलवाद्यांकडून देशविघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत. याअंतर्गत नक्षलवाद्यांच्या घातपाती कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलिस दलाद्वारे नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. यादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पेंढरी उपविभागांतर्गत येत असलेल्या जारावंडी पोलिस ठाणे हद्दीतील जंगल परिसरात गडचिरोली पोलिस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे अधिकारी व जवान नक्षल विरोधी राबवित असतांना नक्षलवाद्यांनी जंगलात पेरुन ठेवलेल्या 2 रायफली हस्तगत करण्यात आल्या. यात 1 सिंगल बॅरल 12 बोअर रायफल व 1 एसएसआर रायफलचा समावेश आहे. सदर अभियान पोलिस अधीक्षक Naxalites seiz नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जारावंडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सुजीतकुमार चव्हाण, सीआरपीएफ पोलिस निरीक्षक धर्मेंद्र कुमार, एसआरपीएफचे पोलिस उपनिरीक्षक कांदहकर व जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली.