तालुका फुलोरा सनियंत्रण समितीच्या वतीने मुरखळा (माल) शाळेला आकस्मिक शाळा भेट - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

तालुका फुलोरा सनियंत्रण समितीच्या वतीने मुरखळा (माल) शाळेला आकस्मिक शाळा भेट

दि. २१.०२.२०२३
Vidarbha News India - VNI
तालुका फुलोरा सनियंत्रण समितीच्या वतीने मुरखळा (माल) शाळेला आकस्मिक शाळा भेट           
                    
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : 
चामोर्शी : तालुका मुख्यालया पासून ५ कि.मी.अंतरावर असलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने फुलोरा उपक्रमांतर्गत शाळा भेट देऊन विद्यार्थ्यांंची अध्ययन स्तर पडताळणी केली. सोबतच शाळा प्रारंभिक मुक्त करण्यासाठी शिक्षकांनी प्रभावी आणि परिणामकारक उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे. शाळा भेटी मध्ये फुलोरा उपक्रमांतर्गत बालभवन मधील शैक्षणिक साहित्याची पाहणी, मराठी व गणित विषयाच्या अध्ययन स्तरानुसार शैक्षणिक साहित्याची मांडणी,नियोजन, कृती पुस्तिका,कृती आराखडा, फुलोरा उपक्रमांतर्गत दस्तऐवज इत्यादी बाबींची पाहणी करून शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
तालुका फुलोरा समितीमध्ये गटसमन्वयक हिम्मतराव आभारे, गट साधन केंद्र चामोर्शी येथील विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते, विवेक केमेकर, घनश्याम वांढरे यांनी पाहणी करून मार्गदर्शन केले.
शाळेच्या वतीने पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर, प्राथमिक शिक्षक रमेश गेडाम, अशोक जुवारे,चंद्रकांत वेटे,जगदिश कळाम,राजकुमार कुळसंगे,कमलाकर कोंडावार उपस्थित राहुन समितीला उत्तम सहकार्य केले.

Share News

copylock

Post Top Ad

-->