दि. १९.०२.२०२३
गोंडवाना विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, प्रा.डॉ.अनिरुद्ध गचके,समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. धनराज पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.प्रा.डॉ. अनिरुद्ध गचके यांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्व गुणांवर प्रकाश टाकला. अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा डॉ. चंद्रमौली यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी गर्जा महाराष्ट्र माझा या राज्य गीताचे गायन करण्यात आले. संचालन व आभार डॉ. नंदकिशोर मने यांनी केले .या कार्यक्रमाला शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.