वाळू माफियांवर पोलीस विभागाची मोठी कारवाई, स्थानिक महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह? - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

वाळू माफियांवर पोलीस विभागाची मोठी कारवाई, स्थानिक महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह?

दि. 14.02.2023

Vidarbha News India - VNI

वाळू माफियांवर पोलीस विभागाची मोठी कारवाई, स्थानिक महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह?

विदर्भ न्यूज इंडिया

प्रतिनिधी/वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी वाळू माफियांवरची कारवाई हिंगणघाट येथील कारडी भारडी घाटात करण्यात आली आहे. वाळू घाटात स्थानिक गुन्हे शाखेच्या, वडनेर पोलीस व वन विभागाचा माध्यमातून संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली.

या कारवाई बाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. हिंगणघाट येथील स्थानिक महसूल विभागाला कुठलीही माहिती न देता गोपनीय पद्धतीने धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये करोडो रुपयांची वाळू चोरी झाल्याचे उघड झाले असून याबाबत वडनेर पोलीस स्टेशन येथे कारवाई सुरू आहे. वडनेर पोलीस स्टेशन परिसरामध्ये वाळू माफियांचा टिप्पर, पोकलेन आणि बोटींची एकच गर्दी पहावयास मिळत आहे.

मागील अनेक दिवसांपासून येथील दारोडा गावानजीक असलेल्या कारडी भारडी घाटामध्ये अनिधिकृतरित्या वाळूची तस्करी केली जात होती. स्थानिक महसूल विभाग या एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळू तस्करीवर कुठलीही कारवाई करत नसल्याने नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. स्थानिक महसूल विभागाच्या अधिकारी या वाळू माफियासोबत संगनमत करून तस्करी करत असल्याचा संशयही येथील हिंगणघाट शहरातील नागरिकांनी व्यक्त केला होता.

ही अनधिकृत वाळू तस्करी हिंगणघाट येथील गुंड प्रवृत्तीचे लोक करत असून यात एका मोठ्या राजकीय नेत्याचे त्यांना पाठबळ आहे, अशी देखील सर्वत्र चर्चा आहे. पत्रकार बातमीसाठी जात असता बंदुकीचा धाक दिला जात होता. मात्र आता स्थानिक गुन्हे शाखेने वाळू घाटावर धाड टाकून 3 पोकलेन मशीन, 6 बोट व 29 टिप्पर जप्त करण्यात आले आहे. वडनेर पोलिसात या प्रकरणात कारवाई सुरू आहे.

अधिकृतरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या एका नेत्याला वाचवण्यासाठी म्हणून हिंगणघाट येथील एक मोठा नेता दबाव आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता दबावाखाली ही कारवाई पोलीस कशा पद्धतीने करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->