तीन वर्षांत 31,839 शेतमजूर आणि 35,950 विद्यार्थ्यांना मृत्यूला कवटाळले, लोकसभेत सरकारने दिली माहीती - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

तीन वर्षांत 31,839 शेतमजूर आणि 35,950 विद्यार्थ्यांना मृत्यूला कवटाळले, लोकसभेत सरकारने दिली माहीती

दि. 14.02.2023

Vidarbha News India - VNI

तीन वर्षांत 31,839 शेतमजूर आणि 35,950 विद्यार्थ्यांना मृत्यूला कवटाळले, लोकसभेत सरकारने दिली माहीती

विदर्भ न्यूज इंडिया

नवी दिल्ली : देशभरात गेल्या तीन वर्षांत 1.12 लाख रोजंदारीवर काम करणाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सरकारने लोकसभेत दिली आहे. केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांनी लोकसभेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची ही आकडेवारी जाहीर केली आहे, साल 2021 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

त्यानंतर तामिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्याचा क्रमांक लागला आहे. त्यामुळे सरकारने असंघटीत क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी होत आहे.

2019 ते 2021 यातीन वर्षांत देशभरात 66,912 गृहीणींनी 53,661 स्वयंरोजगार करणाऱ्यांनी तर 43,420 पगारी व्यक्तींनी तर 43,385 बेरोजगारांनी मृत्यूला कवटाळत आपले जीवन संपविल्याचेही सरकारने म्हटले आहे. २०१९, २०२० आणि २०२१ अशा गेल्या तीन वर्षांत देशभरात आत्महत्या केलेल्यांमध्ये 35,950 विद्यार्थी आणि 31,839 शेती क्षेत्र आणि बागायतदार असल्याचे उघडकीस आल्याचे प्रश्नोत्तराच्या तासांत सरकारने लोकसभेत सांगितले.

असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा, 2008 नुसार, सरकारला असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे बंधनकारक आहे, ज्यात रोजंदारी कामगारांचा समावेश केला असल्याचे सरकारने म्हटले आहे. जीवन आणि अपंगत्व संरक्षण, आरोग्य या विषयांवर कल्याणकारी योजना राबवते. तसेच मातांसाठी संरक्षण, वृद्धापकाळ संरक्षण, आणि केंद्र सरकारद्वारे अन्य फायदे असंघटीत क्षेत्रातील कामगारांना दिले जातात असे सरकारने म्हटले आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) द्वारे जीवन आणि अपंगत्व कवच प्रदान केले जाते, ते म्हणाले .PMJJBY 18 ते 50 वयोगटातील बँक किंवा पोस्ट ऑफिस खाते असलेल्या लोकांसाठी उपलब्ध आहे. ज्यांनी आपल्या खात्यातून हप्ते वळते करण्यास संमती दिली आहे, त्यांच्यासाठी ही योजना लागू असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत सांगितले. या योजनेत जोखीमधारकाचा मृत्यू झाल्यास दोन लाखांचा विमा मिळतो, त्यासाठी खातेधारकाच्या खात्यातून वार्षिक436 रूपयांचा हप्ता कापण्यात येतो. 31 डिसेंबर 2022 पर्यंत या योजनेंतर्गत 14.82 कोटी लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे, असे ते म्हणाले.

या योजनेत जोखीमधारकाचा मृत्यू झाल्यास दोन लाखांचा विमा मिळतो, त्यासाठी खातेधारकाच्या खात्यातून वार्षिक 436 रूपयांचा हप्ता कापण्यात येतो. 31 डिसेंबर 2022 पर्यंत या योजनेंतर्गत 14.82कोटी लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे, असे ते म्हणाले.

Share News

copylock

Post Top Ad

-->