मनिवाईज वित्तीय साक्षरता सेंटर मुलचेरा अंतर्गत बंदुकपल्ली येथे आर्थिक साक्षरता मेळावा संपन्न - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

मनिवाईज वित्तीय साक्षरता सेंटर मुलचेरा अंतर्गत बंदुकपल्ली येथे आर्थिक साक्षरता मेळावा संपन्न

दि.१४.०३.२०२३
Vidarbha News India - VNI
मनिवाईज वित्तीय साक्षरता सेंटर मुलचेरा अंतर्गत बंदुकपल्ली येथे आर्थिक साक्षरता मेळावा संपन्न
             
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/मूलचेरा : भारतीय रिझर्व बँक वित्तीय समावेशन विभागा अंतर्गत बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि मनिवाईज वित्तीय साक्षरता सेंटर मुलचेरा यांच्या संयुक्त विद्यमाने बंदुकपल्ली या ठिकाणी आज १४ मार्च ला वित्तीय साक्षरता मेळावा घेन्यात आला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक मा. यु. टेंभुर्णे सर जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक गडचिरोली.यांनी आर्थिक साक्षरता संकल्पना समजावून सांगितली. तसेच परस्पर व्यवहार करत असतांना ज्या पद्धतीने देवान घेवान करता  त्या पद्धतीने बॅंकेचे लोन परतफेड योग्य पद्धतीने करावे म्हनजे क्रेडिट राखून ठेवता येइल. परत ऑनलाईन व्यवहार करत असतांना सुरक्षा कशी घेता येइल या विशयी मार्गदर्शन केले. आरसेटी अंतर्गत अनेक उधोगधंद्या वर मोफत प्रशिक्षण दिल्या जाते त्याचा लाभ घेण्याचे आव्हान बसलेल्या युवकांना केले. या वेळी उपस्थित बॅंक ऑफ महाराष्ट्र मुलचेरा चे व्यवस्थापक मा. आनंद स्पर्श सर, जिल्हा को. ऑप. बॅंक मुलचेरा व्यवस्थापक  मा. वाय. बि. जेट्टिवार सर. CFL सेंटर चे केंद्र व्यवस्थापक मा. ए. बि. निमसरकार. संगणक चालक कुनाल कुचुलवार. पोलीस पाटील मा सुरेश मडावी.ग्रा. को. स. अध्यक्ष संदीप तोरे. सा. का. मा.हनुमंत मडावी. ICRP समुला करपेत. पालक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित बॅंक मेळाव्याला ऊत्तम प्रतिसाद दिला.

Share News

copylock

Post Top Ad

-->