दि. १४.०३.२०२३
आम्रपाली उपरे या आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्काराने सन्मानित
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर :
ता.प्र पोंभूर्णा : चंद्रपूर जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने 2021-2022 या वर्षात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अंगणवाडी केंद्र उमरी पोतदार येथील अंगणवाडी मदतनीस आम्रपाली मंगेश उपरे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 6000 रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
ग्रामीण भागात आजही काही समाज अशिक्षित असतानाही अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांच्या बालकांना शिक्षित करण्यास कुठली कसर कमी पडू देत नाही. घरातील जबाबदारी पार पाडून लहान बालकांचे संगोपन त्यांना कमी वयातच सुसंस्कार देण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करीत असतात.
अश्या उल्लेखनीय कामे करण्याऱ्या मदतनीसाचे मनोबल वाढवा व निरंतर अशाचप्रकारे कार्य करीत राहावे आणि बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी पंचायत समिती पोंभुर्णा सुनीता मरसकोल्हे यांनी केले.
यावेळी आम्रपाली मंगेश उपरे(मदतनीस) उमरी पोतदार यांना गौरविण्याकरिता उपस्थित सुनीता मरसकोल्हे गटविकास अधिकारी, सौ शुभांगी कनवाळे कार्यकारी दंडधिकारी तहसील कार्यालय पोंभूर्णा, अमित लाडे बाल विकास प्रकल्प अधिकारी, सुषमा धोंगडे घनोटी सर्कल पर्यवेक्षिका, एम. एस. मामीडवार तालुका वैद्यकीय अधिकारी पोंभूर्णा,वंदना खंडाळकर आरोग्य विभाग केंद्र पोंभूर्णा, झाडे मॅडम वैद्यकीय अधिकारी पोंभूर्णा आदींनी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 6000 रोख रक्कम देऊन आम्रपाली मंगेश उपरे मदतनीस यांना गौरविण्यात आले.