Old Pension Yojana | नक्की काय आहे जुनी पेन्शन योजना? जाणून घ्या... १८ लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर..! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Old Pension Yojana | नक्की काय आहे जुनी पेन्शन योजना? जाणून घ्या... १८ लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर..!

दि. १४.०३.२०२३

Vidarbha News India - VNI

Old Pension Yojana | नक्की काय आहे जुनी पेन्शन योजना? जाणून घ्या...

◆ १८ लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर..!

विदर्भ न्यूज इंडिया

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून (14 मार्च) मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे.

या संपामध्ये आजपासून जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी सामील झाले आहेत. या संपाचा परिणाम सरकारी कामकाजावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. जुनी पेन्शन योजना हे नाव सातत्याने ऐकायला मिळत आहे. नक्की काय आहे ही योजना? जाणून घेऊया.

नक्की काय आहे जुनी पेन्शन योजना? (What exactly is Old Pension Scheme?)

सरकारी संस्थेतून सेवानिवृत्त झाल्यावर कर्मचाऱ्यांना उर्वरित आयुष्य जगण्यासाठी पेन्शन दिली जाते. 2004 पर्यंत जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याला पगाराच्या 50 टक्के म्हणजेच निम्मी रक्कम दरमहा पेन्शन म्हणून दिली जात असे. कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर ही रक्कम त्याच्यामागे असलेल्या पती-पत्नीला मिळायची. मात्र, या योजनेतील रकमेसाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा निधी उभारला जात नाही, त्यामुळे या पेन्शनच्या रकमेचा संपूर्ण भार सरकारी तिजोरीवर पडत होता. त्यामुळे सरकारने जुन्या पेन्शन योजनेऐवजी नवीन पेन्शन योजना सुरू केली.

काय आहे नवीन पेन्शन योजना? (What is the new pension plan?)

2003 साली सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारातून 10 टक्के रक्कम कापून NPS मध्ये जमा केली जाते. या रकमेतूनच पुढे कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते. 2004 नंतर सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS अंतर्गत पेन्शन दिली जाते. मात्र, जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेच्या रकमेमध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून नव्या योजनेला विरोध होऊ लागला आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करत आजपासून (14 मार्च) मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहे. या संपाचा सरकारी कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->