दि. २७.०३.२०२३
गोंडवाना विद्यापीठाने पटकाविले उपविजेतेपद
- अ. भा. आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धा
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : सुरेश ज्ञानविहार विद्यापीठ राजस्थान येथे पार पडलेल्या ऑल इंडिया आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संघाने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करत पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत उपविजेतेपद पटकाविले.
यामध्ये महिला गटात ईशा फुलबांधे,श्रद्धा येवले, प्रेरणा गेडाम, श्रद्धा रायपुरे,शासकीय विज्ञान महाविद्यालय, सुदेष्णा भैसारे केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी, गायत्री सराटे,शिवाजी महाविद्यालय गडचिरोली, इशिका वाकडे निळकंठराव शिंदे महाविद्यालय भद्रावती, ऐश्वर्या बोरकर सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही पुरुषांच्या संघात निखिल जांभुळकर, प्रज्वल सोनलकर शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली,कुणाल गलवाले,प्रशिल दातार गोंडवाना विद्यापीठ, अनुराग मडावी भगवंतराव बी एड महाविद्यालय अहेरी,सचिन रोहनकर केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी, निहाल दरी शिवाजी महाविद्यालय, अनिकेत भुरसे महात्मा गांधी, आरमोरी यांचा समावेश होता. विद्यापीठाच्या क्रीडा संचालक डॉ. अनिता लोखंडे यांच्या मार्गदर्शनात तसेच डॉ. ऐवतीकर, मानकर, संघाचे व्यवस्थापक व प्रशिक्षक डॉ. मार्कंड चौरे यांनाही उत्तम भूमिका बजावली.
या सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक करत अधिक उत्तम कामगिरी करण्याच्या शुभेच्छा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी दिल्या आहेत.