दि. २७.०३.२०२३
वंचितापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविणे आवश्यक; कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : ट्रांसजेंडर व्यक्ती संरक्षण हक्क आणि भिक मागणाऱ्या मुलांचे पुनर्वसन हे दोन्ही विषय वर्तमान काळामध्ये खुप संवेदनशील आहे. त्यामुळे शिक्षणापासून वंचितापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविणे आवश्यक आहे असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.
पदव्युत्तर शैक्षणिक जनसंवाद विभाग आणि राष्ट्रिय समाज रक्षा संस्थान, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक संरक्षण संकल्पना क्षेत्रे आणि हस्तक्षेप धोरण ,ट्रान्स जेंडर व्यक्ती संरक्षण कायदा२०१९आणि २०२०, भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींचे पुनर्वसन या विषयांवर तीन दिवसीय कार्यक्रमाचे दुरदृश्य प्रणाली द्वारे नुकतेच आयोजन गोंडवाना विद्यापीठात करण्यात आले होते.त्यावेळी कूलगुरु डॉ. प्रशांत बोकारे पुढे म्हणाले,विद्यार्थी जोपर्यंत सक्षम होणार नाही, तोपर्यंत एक सशक्त समाज निर्माण होणार नाही. समाजा मध्ये अनेक मुले असे आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना शिक्षणापर्यंत पोहचविण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ सदैव तत्पर आहे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना दिल्ली येथील राष्ट्रीय रक्षा संस्थानचे संचालक डॉ. गिरीराज यांनी समाजामध्ये प्रत्येकांचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अजुनही ट्रांसजेंडर व्यक्तिविषयी भेदभाव केला जातो. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. सर्वसमावेशक सुविधा जोपर्यंत समाजातील सर्व स्तरापर्यन्त पोहचणार नाही तो पर्यंत विकास अशक्य आहे असेही संचालक डॉ. आर. गिरीराज म्हणाले.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी डॉ. राजेश कुमार, देल्ही विद्यापीठ तसेच डॉ. नितीश आनंद यानीं सामाजिक संरक्षण संकल्पना क्षेत्रे आणि हस्तक्षेप धोरणे या विषयावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. राजेश बहुघुमा, प्र-कुलपति, उत्तरांचल विद्यापीठ, देहरादून यांनी विद्यार्थांना ट्रांसजेंडर व्यक्ती (संरक्षण हक्क) कायदा, २०१९आणि नियम २०२० या विषयावर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ट्रांसजेंडर व्यक्तीला आपले मुलभुत हक्क मिळावे यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागत आहे. अश्या लोकांना आपण काही तरी वेगळे आहोत याची जाणीव होते. 'स्त्री' किंवा पुरुष या विभागणीत ते दिसत नाहीत. या व्यक्तिंना सहज स्वीकारले जात नाही. त्यांचे अस्तित्व मान्य केले जात नाही. परिणामी त्यांना घर सोडावे लागते. कुटुंब आणि समाजाच्या अवहेलनेला, दडपशाहिला समोर जातांना या व्यक्ति त्यांच्या मुलभुत संवैधानिक, कायदेशीर अधिकारापसून वंचित राहतात. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी डॉ. अभिजीत सोनवने, सोहम ट्रस्ट पुणे यांनी भिक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तीचे पुनर्वसन या विषयांवर आपले विचार व्यक्त केले. कर्यक्रमाचे संचालन संजय पवार आणि श्वेता सेहगल यांनी केले. कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन सहायक प्राध्यापक, डॉ. रुपाली अलोने, समन्वयक डॉ. रजनी वाढई, आणि पदव्युत्तर शैक्षणिक जनसंवाद विभागानी केले. कार्यक्रमामध्ये पदव्युत्तर शैक्षणिक विभागाचे प्राध्यापक वृंद आणि ६० पेक्षा ही अधिक विद्यार्थी उपस्थित होते.