खा. अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे निवेदनद्वारे कृषिपंप धारकांना १२तास विज उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

खा. अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे निवेदनद्वारे कृषिपंप धारकांना १२तास विज उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली

दि. ०२.०३.२०२३
Vidarbha News India - VNI
खा. अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे निवेदनद्वारे कृषिपंप धारकांना १२तास विज उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली

विदर्भ न्यूज इंडिया
मुबंई : खासदार अशोकजी नेते यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या मागणी ला कृषि विजपंप विजधारक शेतकऱ्यांना दिवसा १२ तास कृषि विजपंपाचा लाभ व फायदा  मिळावा यासाठी गडचिरोली चिमुर या क्षेत्रातील शेतकऱ्यांना विजपंप धारकांना फायदा मिळवण्या संदर्भात मान.खासदार महोदयांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या निवासी सविस्तर चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली.
गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात जंगलव्याप्त परिसर असून परिसरात वाघाची दहशत फार मोठया प्रमाणात आहे.तसेच कृषि विजपंप धारक शेतकऱ्यांना दिवस रात्र शेतावर जावे लागेल.दिवसा लोंडसेटिंग मुळे वीज बंद केल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतपिकांवर पाणी करण्यासाठी  रात्रीला जावे लागते. परंतु रात्रीला अंधार असल्याने शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात वाघाचा, कीटकांचा, पशुपक्षी,यांचा  शेतकऱ्यांना फार मोठया प्रमाणात सामना करावा लागतो.
जर शेतकऱ्यांना दिवसा १२ तास विज कृषी पंप विज धारक शेतकऱ्यांना दिल्यास  याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होईल.या संबंधित तात्काळ शेतकऱ्यांच्या विषयी गांभीर्याने दखल घेत खासदार महोदयांनी दिनांक ०१ मार्च ला मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून पाठपुरावाव्याने मागणीद्वारे निवेदन सादर केले.

Share News

copylock

Post Top Ad

-->