प्राथमिक आरोग्य केंद्र, घोट येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिर - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

प्राथमिक आरोग्य केंद्र, घोट येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिर

दि.२ मार्च २०२३
Vidarbha News India - VNI
प्राथमिक आरोग्य केंद्र, घोट येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिर 
दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) विशेष मोहिम कार्यक्रमाचे यसस्वी आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली 
चामोर्शी/घोट : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देषाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर १८ ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन व नियोजन करून अंदाजे एकूण ९००० दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्यानुसार आज दि. १ मार्च, २०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, घोट येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली जिल्हयातिल दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद, गडचिरोली व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली आणि मिशन इंस्टिस्टयुट फार ट्रेनिग, रिसर्च  एंड एक्शन (मित्र)  यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन ग्राम पंचायत घोटच्या सरपंच  रुपाली दूधबावरे, उपसरपंच  विनय बारसागडे, ग्राम पंचायत सदस्य  रेखा  संगीन्वार,  वनिता पोरेड्डीवार,  पंचायत समिती चामॉर्शीचे गट विकास अधिकारी सागर पाटील, अतिरिक्त गट विकास अधिकारी व्ही. व्ही. वनखंडे, ग्राम विकास अधिकारी  विनोद कोटगिरवार,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल हूलके, प्राथमिक आरोग्य केंद्र घोटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोयाम,  समदाय आरोग्य अधिकारी चाटे मॅडम,डॉ. बाच्चानिया सर प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पि.एन ब-हाटे,  औषध निर्माण अधिकारी टी.व्ही. पिट्टलवार, आणि मित्र संस्थेचे अध्यक्ष श्री. अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी विशेष मोहिम तपासणी व निदान कार्यक्रमाचे करण्यात आले. शिबिरात सर्वप्रवर्गातील एकूण ४०० दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता तपासणी व निदान करण्यात आले. तपासणी व निदान झालेल्या पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) आणि विविध योजनांचे माहितीपत्रक स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता तपासणी व निदानासोबतच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या साहित्य उपकरणाकरीता मोजमाप सुद्धा घेण्यात आले. लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्याँना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य देण्यात येईल.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील डॉ. इन्द्रजीत नगदेवते. (मेडीसिन) डॉ. राहुल ठवरे (बालरोग) डॉ. रश्मि रमानी, डॉ. मेघा ठेंगरे, बाळू सहारे (आर्थो) डॉ. सुमित पाने, डॉ. बंडू नगराळे, डॉ. सचिन हेमके, (जिल्हा क्षयरोग अधिकारी) डॉ. पूनम क्षिरसागर, डॉ. दिव्या गोस्वामी, अक्षय तिवाडे, प्रशांत खोब्रागडे, अजय खैरकर, नेहा कांबळे, दीक्षा सोनरखन,  प्राथमिक आरोग्य केंद्र घोट येथील सर्व नर्स ,आरोग्य सेवक इतर कर्मचारी वृंद तालुका आरोग्य विभाग चामोर्शी, पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, आशा, आशा गट प्रवर्तक तथा जिल्हा परिषद् महात्मागांधी हायस्कूल, घोट येथील विद्यार्थी, समन्वयक समग्र शिक्षा अभियान तसेच मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत व सचिव संजय पुसाम आणि प्रवीण राठोड, राकेश बिहाडे, गौरव देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच ग्राम पंचायत घोटचे ग्राम विकास अधिकारी विनोद कोटगिरवार यांच्या  व येथील कर्मचाऱ्याच्या योगदानमुळे सदर कार्यक्रम यशस्वी झाला.

Share News

copylock

Post Top Ad

-->