गडचिरोली जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर

दि. २९.०४.२०२३

Vidarbha News India

गडचिरोली जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यात दोन समित्यांवर भाजपप्रणित पोरेड्डीवार गटाने बाजी मारली, तर प्रत्येकी एका समितीवर अतुल गण्यारपवार गट आणि आदिवासी विद्यार्थी संघाने सत्ता प्रस्थापित केली.

आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपप्रणित सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या गटाने सर्व १८ जागा जिंकून पुन्हा सत्ता प्रस्थापित केली. गडचिरोली बाजार समितीत भाजप-शिंदे गटाच्या युतीने सर्व १८ जागांवर विजय मिळवून सत्ता प्रस्थापित केली. दोन्ही ठिकाणी काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही.

चामोर्शी कृ्षी उत्पन्न बाजार समितीवर माजी सभापती अतुल गण्यारपवार यांच्या गटाने १२ जागा जिंकून पुन्हा सत्ता प्रस्थापित केली. काँग्रेस, ठाकरे गट, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीला ६ जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे विजयी झाले.

अहेरी बाजार समितीवर आदिवासी विद्यार्थी संघाचे ११ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युतीला ७ जागांवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवारांमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा समावेश आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->