दि. २८.०४.२०२३
धामणगाव रेल्वे तालुक्यात अवकाळी पावसामुळे गावकऱ्यांचे व शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधि - सचिन मून
अमरावती/धामणगाव : धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा व सालनापुर येते अवकाळी पावसामुळे गावकऱ्यांचे व शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान.
वादळ वाऱ्यासह गारपीटांचे बळीराजांचे नुकसान. जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सालनापूर या शाळेचे ही छप्पर उडाले.
धामणगाव रेल्वे या तालुक्यातील सावळा व सालनापुर या गावामध्ये वादळ वाऱ्यासह गारपीटांचे बळीराजांचे नुकसान, अवकाळी पाऊस रात्री पासून सुरू असल्याने या पाऊसाने सावळा व सालनापुर मधे घराचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, व सालनापुर मधे नुकतेच घरकुल बाधले त्या घरकुलचे छप्पर उडाले, व कुणाच्या घरात पाणी आले खुप मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची नुकसान झाले नुकसान झालेले गावकरी विजु डोंगरे, राजेश साहरे, दुर्गेश ठाकरे, मिसाळ राजेंद्र ठाकरे ,विजय खरकाटे, रमेश ठाकरे, विजय भोकर, खरकाटे ,ज्ञानेश्वर चावरे, सौरव मिसाळ, नितीन गोटे, भगवान डोंगरे, हरि गडे, शेषराव ठाकरे, देवेंद्र गडे व सतीश कुयटे या गावातील लोकांचे खूप नुकसान झाले. माजी आमदार विरेंद्र भाऊ जगताप यांनी सावळा व सालणापूर गावातील शेतीची पाहणी केली. सालनापुर या गावातील तलाठी मस्के व ग्रामसेवक चौधरी यांनी पाहणी केली. व गावातील सर्व गावकऱ्यांचे मत आहे, की सरकारने मदत करावी.