दि. २४.०४.२०२३
गोंडवाना विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे उद्घाटन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : उद्या २५ एप्रिल रोजी गोंडवाना विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता विद्यापीठ सभागृहामध्ये होणार आहे. या प्रसंगी अध्यासन केंद्राचे उद्घघाटक म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थशास्त्रज्ञ डॉ. सुखदेव थोरात हे उपस्थित राहणार आहेत. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे हे उपस्थित राहणार आहेत . या प्रसंगी डॉ. सुखदेव थोरात यांचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार' या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी सदर कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी, प्राध्यापक आणि परीसरातील इच्छूक व्यक्तीनी घ्यावा असे आहवान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी केले आहे.
