दि. १४.०४.२०२३
गोंडवाना विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
बाबासाहेबांच्या कार्यापासून बोध घ्यायला हवाय- प्र-कूलगुरु डॉ.श्रीराम कावळे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कूलगुरु डॉ.श्रीराम कावळे, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. शैलेंद्र देव,अधिष्ठाता मानव विज्ञान डॉ. चंद्रमौली,संचालक नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य डॉ. मनिष उत्तरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षस्थाना वरून बोलतांना प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, बाबासाहेबांचे कार्य आपल्याला कसे पुढे नेता येईल याचा विचार करायला हवाय. आजही त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे. त्यांच्या कार्यापासून आपण बोध घ्यायला हवा असे ते म्हणाले.
याप्रसंगी अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ.शैलेंद्र देव,अधिष्ठाता मानव विज्ञान डॉ. चंद्रमौली, संचालक नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य डॉ. मनीष उत्तरवार यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले .संचालन या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.नंदकिशोर मने आभार डॉ.प्रमोद जावरे यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.