दि.०६.०४.२०२३
गोंडवाना विद्यापीठाचे ११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये विविध विद्या शाखांच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. यात गोंडवाना विद्यापीठाचे अकरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहे.
यामध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक इतिहास विभागातून रितू विजय हटकर तृतीय, नीलम दिवाकर आतला चतुर्थ, तर प्रियांका राजकुमार कुमोटी गुणवत्ता यादीत पाचव्या आहेत.
उपयोजित अर्थशास्त्र विषयात शुभम धनराज धानफोले प्रथम, रुची पुरुषोत्तम राऊत द्वितीय, उमेश रामदास वैरागडे तृतीय, जनसंवाद अभ्यासक्रमातून पंकज अशोक नंदगिरवार प्रथम, विज्ञान विद्याशाखेतून गणित विषयात आरती हेमराज राठोड प्रथम, श्वेता जुगलकिशोर काब्रा द्वितीय, शुभांगी अविनाश बन्सोड तृतीय तर संगणक शास्त्र विषयात रोहिनी वसंत सोनुले या विद्यार्थीनीने गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे.
अशा एकूण अकरा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्य प्राप्त करून दरवर्षीची अखंड परंपरा कायम ठेवली आहे.
यापूर्वी ही विद्यापीठाचे अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत प्रावीण्य प्राप्त केलेले आहेत.
गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र -कूलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र देव, मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली तसेच सर्व विभाग प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.