दि. २७.०४.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : मनरेगा कामामध्ये दोषी 3 ग्रामसेवक निलंबित
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी MNREGA work योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी व मुलचेरा या तालुक्यातील करोडो रुपयाची बोगस कामे तसेच काम न करता पैशाची उचल करणार्या 3 ग्रामसेवकांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
वरिल कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याने त्या कामाची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकार्यांना दिलेल्या निवेदनातू केली होती.
त्या अनुषंगाने उपमुख्य कार्यकारी MNREGA work अधिकारी (ग्रा.पं.) रविंद्र एस. कणसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने चौकशी करून अहवाल सादर के ला होता. प्राप्त चौकशी अहवालामध्ये भामरागड येथील गट विकास अधिकारी, शाखा अभियंता, सहाय्यक लेखा अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), व 6 ग्रामसेवक आदी प्रथम दर्शनी दोषी आढळुन आल्याने 3 ग्रामसेवकांना तात्काळ निलंबित करण्यात आले. तर उर्वरीत ग्रामसेवक व शाखा अभियंता यांच्यावर विभागीय चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच गट विकास अधिकारी यांच्याविरुध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याकरीता विभागीय चौकशी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. निलंबित करण्यात आलेल्या ग्रामसेवकांमध्ये विशाल एस. चिडे मनेराजाराम (पंचायत समिती भामरागड), सुनील बी. जट्टीवार बोठनफुंडी (पंचायत समिती भामरागड) तर लोमेश यादवराव सिडाम उमानुर (पंचायत समिती अहेरी) यांचा समावेश आहे.
