कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान..! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान..!

दि. २८.०४.२०२३

Vidarbha News India

Market Committee Election : 

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

विदर्भ न्यूज इंडिया

Market Committee Election : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या  कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी(Market Committee Election) आज मतदान होणार आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळं आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. आज राज्यातील 147 बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला

सर्वच राजकीय पक्षांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, कुठे बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे तर कुठे निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा समना होत आहे. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत.

ग्रामीण भागात कोणाचं वर्चस्व हे 30 एप्रिलला समजणार

राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक लागली आहे. यामधील काही बाजार समितीत्या बिनविरोध देखील झाल्या आहेत. बाजार समित्यांसाठी आज (28 एप्रिल) मतदान होणार आहे. तर 30 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे हे आपल्याला 30 एप्रिललाचं समजणार आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरोधात भाजप आणि शिंदे गट निवडणूक लढवत आहे. तर काही ठिकाणी नेत्यांनी त्यांचे स्वतंत्र पॅनेल उभं केल्याचं चित्र दिसत आहे.

बऱ्याच ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत

स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप अशी लढती होणार आहेत. तर काही ठिकाणी काही पक्ष स्वतंत्र ताकद अजमावत असल्याचे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न केले. प्रचाराच्या सभा, संपर्क मोहीम यासह सर्व पद्धतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच पक्षाच्या पॅनलकडून केला गेला. 

Share News

copylock

Post Top Ad

-->