दि. २५.०४.२०२३
Vidarbha News India
विदर्भात अनेक जिल्ह्यात गारपिटासह अवकाळी पाऊस सुर..!
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : पुढचे दोन दिवस म्हणजे 25 आणि 26 एप्रिल रोजी (Vidarbha Thunderstorm) विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 एप्रिलला मराठवाड्यातील बीड आणि उस्मानाबाद तसेच पुणे, सातारा, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, परभणी, बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळात गारपिटीची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. सोबतच (Vidarbha Thunderstorm) विदर्भातील यवतमाळ आणि वर्धा, वाशीममध्ये काही ठिकाणी वादळी वारे (40-50 किमी प्रतितास) आणि गारपिटीची शक्यता आहे. तसेच गडचिरोली आणि नागपूरच्या वेगवेगळ्या ठिकाणी सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) वाहण्याची शक्यता आहे.
नागपूरात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण नागपूरात आज दुपार नंतर सोसाट्याचा वाऱ्यासह आणि विजांचा कडकडाटात रिमझिम पाऊस पडत आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने रस्त्यावरील नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत आहे. हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात साडेसहा वाजेपर्यंत रिमझिम पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. नागपूरात आणखी 4 दिवस पाऊस पडण्याचा शक्यता प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे.