दि. १८.०४.२०२३
Vidarbha News Indiaवाढदिवसानिमित्त दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर : पोभूर्णा तालुक्यातील देवाडा बुज येथील आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा 'विदर्भ न्यूज इंडिया' चे लोकप्रिय आदर्श पत्रकार विकास भाऊ शेडमाके यांनी त्यांचा वाढदिवस चौदा एप्रिल रोजी आला असून सदर वाढदिवस आपल्या कुटुंबियांसोबत न घालवता सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी आपला वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा करून दिव्यांग अंपग निराधार व्यक्तींना नोटबुक पेन इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले होते. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्त्याने दोन वर्षांपासुन राबविल्या जात असल्याने त्यांच्या मौलीक कार्यांसंबधी अनेकांकडून कौतूक केल्या जात आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शंकर आत्राम सहाय्यक शिक्षक अशोक आलाम, वाल्मीक निमसरकार रतिशा रामटेके मॅडम प्रतिष्ठित नागरिक सुधाकर मंडोवगडे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.