दि.०१.०५.२०२३
Vidarbha News India
आपला दवाखाना याेजना ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी सुरू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विदर्भ न्यूज इंडिया
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजना आजपासून सुरू करण्यात आली आहे.
आपला दवाखाना योजनेतून ३० विविध चाचण्या मोफत
एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'आपल्याला कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली. आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे. या योजनेतून ३० विविध चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. 'सामान्य माणसांचा विचार करून लोकाभिमुख, लोकोपयोगी निर्णय घेण्यात सरकार प्रय़त्नशील असून, त्यामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.