दि.०१.०५.२०२३
गडचिरोली : ट्रकने युवकास फरफटत नेले, कारगील चौकात भयानक अपघात..!
- शहरात अपघाताची घटना सुरूच...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : शहरातील कारगील चौकात अंगावर काटे उभे करणारा अपघात आज 1 मे रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडला. अक्षरशः ट्रेलर ट्रकने युवकास चिरडत काही दूरवर फरफटत नेले. यावेळी पाहणाऱ्यांच्या अंगावर जणू काटाचा येत होता. (Road accident gadchiroli trailer)
चंद्रपर शहराकडून गडचिरोली येथे येत असलेला भरधाव ट्रेलर ट्रक हा कारगील चौकात पोहचतात ट्रकच्या चाकाखाली सायकलस्वार आल्याने अपघात घडला. दरम्यान सायकलचालक हा दोन चाकांच्या मधात अडकल्याने युवकाला काही अंतरावर फरफटत नेले. यात युवकाचा जागीच मृत्यु झाला तर मृतदेह छिन्नविछिन्न असस्थेत होता. अपघात होताच पाहणाऱ्यांची झुंबड उडाली होती. घटनेची माहिती पोलीसांना देताचा पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बातमी लिहेस्तव अपघातातील मृतकाचे नाव कळु शकले नाही.
शहरात भरधाव ट्रक वाहतूक करत असल्याने रस्ते सुरक्षित राहिले नाही अशी बोंबही नागरिक करीत असून अवजड वाहनाच्या स्पीड वर मर्यादा आणावी अशी मागणीही नागरिक करत असून ट्रकचालकांविरुद्ध रोष व्यक्त करीत होती. सुरजागड येथून दररोज लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची रेलचेल असते त्या ट्रकांची शहरातून स्पीड कमी होत नसल्याने शहरातील अवजड ट्रकच्या वाहतुकीचा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला असल्याने शहरातून वाहतूक करण्याऱ्या ट्रकच्या स्पीड वर वाहतूक पोलीस मर्यादा आणणार काय याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे.