दि.३०.०५.२०२३
Vidarbha News India
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन...
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर (वय ४७) यांचे दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात आज (मंगळवार) पहाटे निधन झाले आहे. सकाळी एयर अॅम्बुलन्सद्वारे त्यांचं पार्थिव आणण्यात येईल.
यानंतर वरोरा येथे बुधवारी (ता. ३१) त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती 28 मे रोजी अचानक बिघडली होती. धानोरकर यांना एयर अॅम्बुलन्सद्वारे नागपूर येथून नवी दिल्लीत उपचारासाठी रवाना करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. नागपूरमध्ये याआधी त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात किडनी स्टोन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना आतड्याचे इन्फेक्शन झाले. त्यावर अधिक उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने रवाना करण्यात आले होते.
बाळू धानोरकर हे आधी शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले. राज्यात काँग्रेसचे चे एकमेव खासदार होते.
बाळू धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले होते. बाळू धानोरकर यांनी वडिलांच्या पार्थिवाचं दर्शन घेतले होते. पण, भद्रावती येथे झालेल्या अंतीम संस्काराला बाळू धानोकर हे उपस्थित राहू शकले नाही. कारण त्यांची स्वतःची प्रकृतीदेखील चांगली नव्हती. शेवटी बाळू यांचे भाऊ अनिल धानोरकर यांनी वडिलांच्या पार्थिवावर अंतीम संस्कार केले.