अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पहाटे ३ वाजता घडली घटना - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पहाटे ३ वाजता घडली घटना

दि. १०.०५.२०२३

Vidarbha News India

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पहाटे ३ वाजता घडली घटना

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : सोमनपल्ली- सिरोंचा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना १० मे रोजी पहाटे तीन वाजता बालमृत्यमपल्ली गावाजवळ घडली.

प्रवीण पानेमा (२६, रा.सिरोंचा) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुचाकीवरून (एमएच ३३ ई-३९५०) तो सोमनपल्ली येथून सिरोंचाला जात होता. बालमृत्यमपल्ली गावानजीक संमक्का सारक्का मंदिरासमोर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पहाटे साडेपाच वाजेपर्यंत त्याचा मृत्यूदेह रस्त्यावरच पडून होता.

स्थानिकांनी असरअली पोलिस ठाण्यात माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. दुचाकीजवळ मयताचे कपडे, चादर व ब्ल्यूटूथ पडलेले आढळले. पोलिसांनी दुचाकीसह साहित्य ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात आला. तपास सुरू असल्याचे पोलिस निरिक्षक राजेश गावडे यांनी सांगितले.

Share News

copylock

Post Top Ad

-->