नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती यांच्या हस्ते झाले पाहिजे ; डॉ. नामदेव उसेंडी - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती यांच्या हस्ते झाले पाहिजे ; डॉ. नामदेव उसेंडी

दि. २७.०५.२०२३
नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती यांच्या हस्ते झाले पाहिजे ; डॉ. नामदेव उसेंडी

Vidarbha News India
नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते न करता,  देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती यांच्या हस्ते उद्घाटन झाले पाहिजे - डॉ नामदेव उसेंडी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : देशाच्या घटनेप्रमाणे या देशाच्या प्रथम नागरीक हे राष्ट्रपती आहेत. आणि यावेळेस पहिल्यांदाच देशाला आदिवासी महीला राष्ट्रपती लाभलेले आहेत. खरं म्हणजे लोकशाही मध्ये नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्याचं हक्क नैतिक दृष्टया हा राष्ट्रपतीचं असतो. परंतू या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी स्वतःच उदो उदो करून घेण्यासाठी या महिला राष्ट्रपतींचे हक्क डावलून स्वतःचे हाताने नवीन संसद भवनाचे उद्घाटन करीत आहेत. महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपती जी मुर्मू यांच्या अपमान करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस, गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज दिनांक २७.०५.२०२३ रोजी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात निषेध  व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी,  जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव डॉ नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ नितीन कोडवते,  कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शहरअध्यक्ष सतीश विधाते, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, प्रदेश प्रतिनिधी समशेरखान पठाण,  महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड. कविता मोहरकर, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, उपाध्यक्ष अनिल कोठारे, तालुकाध्यक्ष वसंता राऊत, तालुकाध्यक्ष आदिवासी काँग्रेस शिवराम कुमरे, प्रदेश महासचिव युवक काँग्रेस कुणाल पेंदोरकर,
जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष सहकार विभाग भरत येरमे, माजी तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे,  रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, विधानसभा अध्यक्ष महेश जिल्लेवर, माजी अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष अपर्णा खेवले, कुसुम आलम, प्रदेश सचिव युवक काँग्रेस प्रतीक बारसिंगे,  जितेंद्र मुनघाटे, चोखजी भांडेकर,  दीपक रामणे, लालाजी सातपुते, देवेन्द्र भोयर, रुपेश धकाते, मिलिंद बरसागडे, भुपेश  नांदनकर, मोरेश्वर हजारे, अविनाश बांबोळे, भजनाराव पदा, रवींद्र ठवकर, रामचंद्र सहारे, फिरोज, विक्रम गेडाम, कल्पना नादेश्वर, आशा मेश्राम,  वंदना ढोक, बबिता उसेंडी, पौर्णिमा भडके, शशिकला मडावी, आरती कंगाले, शालिनी उईके, वनिता ताराम, मायाबाई उसेंडी, सुनीता उसेंडी, संजय गावडे, पंकज खोबे, दत्तात्रय करंगामी, अनुप कोहळे, शुभम किरमे आदी काँगेस पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->