नोटा बदलण्यासाठी नक्षलवाद्यांच्या हालचाली; दोन नक्षल समर्थकांना अटक - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

नोटा बदलण्यासाठी नक्षलवाद्यांच्या हालचाली; दोन नक्षल समर्थकांना अटक

दि.२९.०५.२०२३

Vidarbha News India 

Maharashtra-Chhattisgarh Border : 

नोटा बदलण्यासाठी नक्षलवाद्यांच्या हालचाली; दोन नक्षल समर्थकांना अटक

विदर्भ न्यूज इंडिया

नागपूर : केंद्र सरकारने 2 हजार रुपयांची नोटबंदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नोटबंदीनंतर नक्षल स्थानिक व्यापारी, व्यावसायिक व तेंदूपत्ता कंत्रादार यांच्यावर दबाव आणून नोटा बदली करण्याची शक्‍यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलिसांची करडी नजर असून रांजणगाव येथे दोन नक्षल समर्थकांना नोटा बदलीला जाताना अटक करण्यात आल्याचे महाराष्ट्र नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले.

माओवादी चळवळ चालवताना माओवाद्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते. माओवाद्यांकडे हे पैसे एक तर खंडणीच्या माध्यमातून येतात किंवा त्यांच्या समर्थकांनी पाठवलेला असतो. जंगलात हा पैसा हाताळताना माओवादी दोन हजारच्या नोटेला अधिक प्राधान्य देत होते. कारण एक तर दोन हजारच्या नोटा जंगलात हाताळताना सोपे जायचे किंवा जमिनीखाली लपून ठेवताना त्या नोटांचा आकार लहान असायचा. महत्वाचे म्हणजे शस्त्र किंवा उपकरणे खरेदीसाठी पैसा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवताना दोन हजारच्या नोटा माओवाद्यांसाठी सर्वोत्तम चलन होते. मात्र, ही नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता माओवाद्यांची कोंडी झाली आहे.

या नोटबंदीच्या निर्णयानंतर माओवादी दोन हजारच्या नोटांची बदली करण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. रांजणगाव येथे दोन नक्षल समर्थकांना सहा लाखाच्या नोटांची बदली करताना अटक करण्यात आली. त्या तपासात माओवादी दोन हजाराच्या नोट बदलीसाठी कंत्राटदार व व्यापाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचे उघड झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्‍यातील तोडगट्टा येथून छत्तीसगडच्या शिलगर येथील नक्षल समर्थक आंदोलनाला पैसे पाठवत असल्याचे पुढे आले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांची या सर्वांवर बारीक पाळत असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.

Share News

copylock

Post Top Ad

-->