गडचिरोली : सूरजागड लोहखनिज वाहतुकीने घेतला शिक्षकाचा बळी, आलापल्ली येथील घटना - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

गडचिरोली : सूरजागड लोहखनिज वाहतुकीने घेतला शिक्षकाचा बळी, आलापल्ली येथील घटना

दि. २०.०५.२०२३

Vidarbha News India

गडचिरोली : सूरजागड लोहखनिज वाहतुकीने घेतला शिक्षकाचा बळी, आलापल्ली येथील घटना

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : पाच दिवसांपूर्वी आष्टी येथे एका १२ वर्षीय मुलीला चिरडणाऱ्या सूरजागड लोहखनिज वाहतुकीने आज पुन्हा एका शिक्षकाचा बळी घेतला आहे. वासुदेव कुळमेथे (४९ रा.गोमनी ) असे मृत शिक्षकाचे नाव असून हा अपघात आलापल्ली येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर घडला. यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास काटेपल्ली येथील भगवंतराव आश्रम शाळेत शिक्षक असलेले वासुदेव कुळमेथे हे आपल्या दुचाकीने चंद्रपूर मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून जात होते. दरम्यान, मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आलापल्ली येथील मुख्य चौकात घडल्याने ट्रकचालकाला नागरिकांनी पकडून ठेवले होते. सूरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ते शहरातूनदेखील भरधाव जात असतात. त्यामुळे या मार्गावर कायम अपघाताचा धोका असतो. काही दिवसांपूर्वी असेच एका अवजड वाहनाने आष्टी येथे १२ वर्षीय मुलीला चिरडले होते. आता निर्दोष शिक्षकाला जीव गमवावा लागला. त्यामुळे सूरजागड लोहखनिज वाहतूक आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

प्रशासनाची कार्यतत्परता चर्चेत

एरवी कोणतीही घटना घडल्यावर उशिराने जागे होणारे प्रशासन सूरजागडच्या वाहनांनी अपघात झाल्यास तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात घेतात. एवढेच नव्हे तर अवघ्या काही मिनिटांत परिस्थिती जैसे थे करून वाहतूक सुरळीत करतात. लोकं मेली तरी चालेल पण लोहखनिज वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये. हा नियम ते काटेकोरपणे पाळताना दिसून येतात. अशी चर्चा अपघातस्थळी होती.


Share News

copylock

Post Top Ad

-->