गोंडवाना विद्यापीठाची प्राध्यापक पद भरती रद्द करा; संतोष सुरपाम यांची आदिवासी विकास मंत्री कडे मागणी - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गोंडवाना विद्यापीठाची प्राध्यापक पद भरती रद्द करा; संतोष सुरपाम यांची आदिवासी विकास मंत्री कडे मागणी

दि. ०८.०५.२०२३
Vidarbha News India
गोंडवाना विद्यापीठाची प्राध्यापक पद भरती रद्द करा; संतोष सुरपाम यांची आदिवासी विकास मंत्री कडे मागणी 

विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाची प्राध्यापक पद भरती रद्द करा संतोष सुरपाम यांचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित कडे रामनगर नागपु र कार्यालयात प्रत्यक्ष भेटुन निवेदनाद्वारे केली मागणी.

पदभरती मध्ये आदिवासीसाठी पद असणे गरजेचे,आपन स्वत: कुलगुरू यांच्याशी चर्चा करु असे दिले आश्वासन

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा प्राध्यापक पदभरतीची जाहीरात   employment notice/50/2023 दि.04/02/2023 रोजी एकुन 30 पदाची जाहीरात प्रसिद्ध केली पन त्यात एकही अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता राखीव ठेवल्या गेली नाही. त्यामुळे ही पदभरती तत्काळ रद्द करावी अशी मागणी मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत संतोष  छबिलदास सुरपाम यांनी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि गोंडवाना विद्यापीठाने काढलेल्या जाहीराती मध्ये ईग्रजी -1.गणीत -1 ,रसायनशास्त्र-4, भौतिकशास्त्र-4कॉम्पुटर सायन्स-4ऊपयोजीत अर्थशास्त्र -4 मराठी-4,एमबीए-4जनसंवाद-4विषययाकरीत एकुन 30 पदे प्राध्यापक म्हणून भरती प्रक्रिया राबवायची आहे परंतु त्यांमध्ये एसी-1,विजे(ए)-1,एनटी(सी)-2,एनटी(डी)-1,एसबीसी-1,ओबीसी-9,ईडब्ल्यूएस- 3,व ओपन -9 पन यात अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता करीता राखीव एकही जागा न ठेवल्याने ही जाहीरात व प्राध्यापक पदभरती रद्द करावी, त्या सोबतच संवर्गनिहाय पदभरती न करता विषय निहाय आरक्षण देऊन पदभरती करावी अश्या आशयाचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावीत, यांना रामनगर नागपुर येथील कार्यालयातल प्रत्यक्ष भेटुम निवेदन दिले याविषयी आपन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु यांच्याशी स्वत: वार्तालाप करु आणी अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता राखीव असल्याशिवाय पदभरती होणार नाही असे आश्वासन अध्यक्ष संतोष सुरपाम यांना दिले असल्याची माहीती दिली आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->