दि. ०७.०५.२०२३
Vidarbha News India
अन् कोरडा पडलेला सहस्त्रकुंड धबधबा अवकाळीमुळे झाला प्रवाहित
विदर्भ न्यूज इंडिया
नांदेड : निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा विदर्भ मराठवाडा सीमेवर वसलेला नांदेड (Nanded) जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटकांसाठी एक पर्वणीच. गेल्या काही दिवसांपासून पडत असणाऱ्या अवकाळीमुळे पावसामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड (Sahastrakund) धबधबा हा प्रवाहित झाला आहे. ज्यामुळे पर्यटकांचे पाय या धबधब्याकडे आपसूकच वळत आहेत. इस्लापुर जवळचा सहस्त्रकुंड इथला पैनगंगा नदीवरचा (Panganga River) धबधबा हा अवकाळी पावसामुळे प्रवाहित झालायं. तर तो खळाळून वाहतोय. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाहणारा सहस्त्रकुंड धबधबा हा ऐन मे महिन्यात प्रवाहित झाल्याने पर्यटकांची पावले सहस्त्रकुंडकडे वळाली आहेत.