दि. १३.०५.२०२३
Vidarbha News India
वजन वाढलेल्या पोलिसांचे भत्ते कमी करा, नितीन गडकरी यांचा सल्ला
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : पोट निघालेल्या आणि वजन वाढलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे भत्ते कमी करा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
शुक्रवारी नागपूर पोलीस आयुक्तालय नागपूर शहर अंतर्गत स्मार्ट लकडगंज पोलीस ठाणे, गाळे आणि विविध प्रकल्पांच्या उद्घाटन, भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, पोलिसांचे आरोग्य चांगले असायला हवे. म्हणून पोलीस गाळे परिसरात जिमसह इतरही सोयी हव्यात. सुदृढ आरोग्य ठेवण्याकडे पोलिसांनी स्वतःवर अधिक लक्ष देण्यासाठी पोट निघालेल्या, वजन वडलेल्यांचे भत्ते कमी करायला हवे. त्याने हे कर्मचारी आरोग्याबाबत जास्त गंभीर होतील. पोलीस आयुक्तांनी पोलिसांना सुदृढ ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे आवाहनही गडकरी यांनी केले.