शिंदे-फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी लावला आपापल्या मनाप्रमाणे कोर्टाच्या निरीक्षणांचा अन्वयार्थ - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

शिंदे-फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी लावला आपापल्या मनाप्रमाणे कोर्टाच्या निरीक्षणांचा अन्वयार्थ

दि. ११.०५.२०२३

Vidarbha News India

Interpretation Court Observations : 

शिंदे-फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी लावला आपापल्या मनाप्रमाणे कोर्टाच्या निरीक्षणांचा अन्वयार्थ

विदर्भ न्यूज इंडिया

मुंबई :  एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणांचा आपापल्या मनाप्रमाणे अन्वयार्थ लावल्याचे दिसून येते. दोन्ही गटांकडून कोर्टाने आपल्यालाच बरोबर ठरवल्याचे सांगण्यात आले.

त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले.

आज सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षाच्या निर्णयासंदर्भात स्वल्पविराम देऊन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने मोठ्या ७ सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे हे प्रकरण आता मोठ्या घटनापीठापुढे पुन्हा सुनावणीस येईल. त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल. मात्र हा निर्णय देताना विद्यमान घटनापीठाने विविध निरीक्षणे नोंद केली आहेत. त्यावर वादी तसेच प्रतिवादी गटाकडून अन्वयार्थ काढले जात आहेत. त्यातील महत्वाचे मुद्दे काय आहेत ते पाहूयात.

कोर्टाच्या निरीक्षणांचा अन्वयार्थ

या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे तसेच प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आपली रोखठोक मते मांडली आहेत. त्यामध्ये ते म्हणतात की कोर्टाच्या निरीक्षणांचा विचार करता नैतिकतेच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे. तसेच, राज्यपालांनी संपूर्णपणे घटनाबाह्य निर्णय घेतल्याने सर्वकाही घडले आहे, असा अर्थ निरीक्षणांमधून स्पष्ट होतो असेही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच कोर्टाच्या निरीक्षणांवरुन हेही स्पष्ट होते की एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली कोर्टानेच यावर शिक्कामोर्तब केल्याचे ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आज सर्वोच्च न्यायालयानेच सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचे धिंडवडे काढले असेही मत ठाकरे यांनी मांडले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यपालांचे तर कोर्टाने थेट वस्त्रहरणच केले आहे. त्यांच्या निर्णयावर कोर्टाने सरळ-सरळ आक्षेप घेतल्याचे मत ठाकरे यांनी मांडले. त्यामुळे आजच्या निरीक्षणानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी उगाचच पेढे वाटू नये असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा विचार करता बहुमत चाचणी व व्हिप बेकायदेशीर ठरत असेल तर सर्वच बेकायदेशीर आहे, असेही ठाकरे म्हणाले. त्यामुळे थोडी तरी नैतिकता त्यांच्यामध्ये शिल्लक असेल तर सरकारने ताबडतोब राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

कोर्टाच्या निरीक्षणांचा अन्वयार्थ

दुसरीकडे शिंदे-फडणवीस गटानेही कोर्टाच्या निरीक्षणांचा अन्वयार्थ आपल्या परीने लावला आहे. त्यामध्ये राज्यपालांनी परिस्थितीनुसार निर्णय घेतला होता असे मत शिंदे आणि फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मांडले. सरकार घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना ही मोठी चपराक बसली आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडले. नैतिकतेसंदर्भात कोर्टाच्या निरीक्षणावरुन ज्या बाता केल्या जात आहेत, त्यावर बोलताना या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन केली तेव्हा नैतिकता कुठे गेली होती असा सवाल शिंदे यांनी केला.

कोर्टाच्या निरीक्षणांचा अन्वयार्थ

यावेळी पत्रकार शिंदे गटाने कोर्टाच्या निर्णयासंदर्भात बोलताना सांगितले की, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे, नियमाबाहेर कोणाला जाता येणार नाही. कोर्टाच्या निरीक्षणांचा विचार करता आमचे सरकार कायदेशीर चौकटीतच आहे. बहुमताचे सरकार आम्ही स्थापन केले आहे. खरी शिवसेना आम्ही आहोत. धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यामुळे व्हीप आमचाच असेल असेही शिंदे म्हणाले. तसेच सुप्रीम कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार सध्य परिस्थितीत आमदार अपात्रतेचा निर्णय विद्यमान विधानसभा अध्यक्षच घेणार आहेत. त्यामुळे आमच्या सरकारला अजिबात धोका नाही. उलट या निर्णयामुळे आमचे सरकार आणखी मजबूत झाल्याची प्रतिक्रिया शिंदे-फडणवीस गटाकडून अन्वयार्थ काढताना व्यक्त केली आहे.


Share News

copylock

Post Top Ad

-->