दि.०३.०५.२०२३
Vidarbha News India
वाघांच्या मिश्यांचीही तस्करी, 3 तस्करांना केलं जेरबंद, अधिकारीही पडले बुचकळ्यात!
विदर्भ न्यूज इंडिया
भंडारा : विदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून वन प्राण्यांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. अनेक शिकारीच्या घटनाही समोर आल्या आहेत.
अशातच वन विभागाने एक तस्कराची टोळी जेरबंद केली आहे. वन्यप्राणी बिबट्या आणि वाघांची शिकार करुन वाघाच्या 18 मिश्यांची तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. भंडारा वनविभागाने ही कारवाई केली आहे. विदर्भात वाघांची संख्या वाढली असली तरी त्यांना असलेला शिकाऱ्यांचा धोका टळलेला नाही.
शिकारीसाठी विद्युत प्रवाहाचा तर कधी विषप्रयोगाचा उपयोग करुन शिकार करतात आणि वाघांच्या अवयवांची तस्करी केली जाते. अशीच एक तस्करी रोखण्यात वन विभागाला यश आले आहे. वन्यप्राणी बिबट वाघाच्या 18 नग मिश्यांचे केस सहित 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. (Sangli News: एक फांदीही न तोडता 20 फुटांचं झाड रस्त्यातून केलं बाजूला, पाहा हा ) गेल्या काही दिवसांपासून वनविभागाला भंडारा येथे वाघाच्या मिशांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली.
वनविभागाचे अधिकारी यावर लक्ष ठेवून होते. सापळा रचत तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेतले. (पाळीव कुत्र्यांमुळे पसरतोय अस्थमा! तुम्हीही ही चूक नाही करताय ना? आरोपींमध्ये अश्फाक शेख (वय 42 वर्ष रा.लाखनी), प्रकाश मते (वय 47 वर्ष रा.टवेपार/मोहदुरा) आणि रवींद्र बारई (वय 34 वर्ष रा.साहुली ता.जि.भंडारा) यांचा समावेश आहे. वन विभागाने तिन्ही तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून साहित्य जप्त केलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील पळसदेव- काळेवाडी नंबर 2 इथं बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे.
अचानक रस्त्यावर बिबट्या आल्यानंतर अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याने तो काही काळ रस्त्यावरती जखमी अवस्थेत पडला होता. स्थानिकांसह प्रवाश्यांनी तो बिबट्या असल्याची खात्री केली. त्यानंतर वनविभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तसंच फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्यांना ही माहिती दिली. त्यानंतर तातडीने त्या बिबट्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यंत तो गतप्राण झाला होता.