दि. ०३.०५.२०२३
Vidarbha News India
राष्ट्रवादीची नवी कार्यकारिणी जाहीर होणार? समितीमध्ये कुणाचा असणार सहभाग?
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा काल राजीनामा दिला आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते व्यथित होऊन शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी या नेत्यांकडून केली जात आहे. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसतेय. अशातच राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नावांसह आता राष्ट्रवादीची नवी कार्यकारिणी समिती जाहीर होण्याची शक्यता असल्याचे समोर येत आहे. या राष्ट्रवादीची नवी कार्यकारिणी समितीमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांचा सहभाग असणार आहे. तर यांच्यासह जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांचाही समावेश असेल त्यासोबतच के.के शर्मा, पीसी चाको आणि अनिल देशमुख यांचाही समावेश असणार असल्याचे सांगितले जात आहे.
Nationalist Congress Party