दि. ३१.०५.२०२३
सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्थेचा सुशिला काव्यविचार साहित्य उपक्रमाचा निकाल उत्साहात घोषित
- सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा गडचीरोली अंतर्गत सुशिला काव्यविचार साहित्य मंच परिवारात शंभरावा उपक्रमाचा निकाल उत्साहात घोषित
विदर्भ न्यूज इंडिया
चामोर्शी/ घोट : सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा जिल्हा गडचिरोली अंतर्गत सुशिला काव्यविचार साहित्य मंच परिवारात शतकपूर्तीनिमित्त "साहित्याचे विश्व" या विषयावर राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा २० मे , रोजी आयोजित करण्यात आली होती. या विषयावर राज्यातील अनेक कवी/कवयित्रीनी सहभाग नोंदविला. या काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षण मा.ज्येष्ठ कवयित्री सौ.सरोज अंदनकर(नागपूर ) यांनी केले व परीक्षण करून दहा नंबर काढले. स्पर्धेत कवयित्री आलियागोहर जाकीर शेख धुळे यांनी सर्वोत्कृष्ट क्रमांक पटकावला तर डाॅ. श्री आर.पी. गावंडे मंगेशी गोवा व श्री खंदारे सूर्यभान गुणाजी यांनी उत्कृष्ट क्रमांक पटकावला कु. मनिषा भिमराव बिऱ्हाडे पाचोरा, सौ. अनुराधा रत्नाकर उपासे, श्री अनंत तेलंग देऊळगावराजा या कवींनी प्रथम क्रमांक पटकावला श्री. घनश्याम पं थूल वर्धा, सुजाता साळवे अंबरनाथ यांनी द्वितीय क्रमांक पटकावला रविंद्र गिमोणकर नागपूर तसेच प्रभाकर देविदास दुर्गे अडपल्ली यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना व सहभागी स्पर्धेकाना सुशिला बहुउद्देशीय संस्था अंतर्गत आकर्षित सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संस्थापिका मा. प्रियंका वाकडे / शेंडे प्रशासक मा.गंगा.सपकाळे मार्गदर्शक मा.शोभा वेले मा.रजनी कांबळे मा. मिलिंद खोब्रागडे संकलक मा.प्रभाकर दुर्गे सहकार्य मा . योगेश ताटे मा स्नेहल वाकडे यांच्या हस्ते निकाल दिनांक २९/०५/२०२३ रोजी उत्साहात घोषित करण्यात आला.