दि. १.०६.२०२३
Vidarbha News India
ACB Trap Case | 5 हजाराची लाच घेणारा ग्रामसेवक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
विदर्भ न्यूज इंडिया
नाशिक : ACB Trap Case | घरकुलाची मंजुरी आणुन दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणुन तसेच यापुढेही नमुद घरकुलासाठी शासनाकडुन मिळणार्या रक्कमेचे हप्ते विनाअडथळा बँक खात्यावर लवकर जमा करण्यासाठी 5 हजार रूपयाची लाच घेणार्या नाशिक (Nashik ACB Trap) जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri Bribe Case) तालुक्यातील अधरवड ग्रामपंचायत कार्यालयातील (Adharwad Grampanchayat) ग्रामसेवकास (Gramsevak) अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. (ACB Trap Case)
हंसराज श्रावण बंजारा (Hansraj Shravan Banjara) असे लाच घेणार्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भावाचे रमाई घरकुल आवास योजनेसाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करून घरकुलाची मंजुरी आणुन दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणुन तसेच यापुढेही नमुद घरकुलासाठी शासनाकडून मिळणार्या रक्कमेचे हप्ते विनाअडथळा बँक खात्यावर लवकर जमा करण्यासाठी हंसराज श्रावण बंजारा यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, आज (दि. 31 मे) सरकारी पंचासमक्ष हंसराज श्रावण बंजारा यांनी तक्रारदाराकडून ग्रामसेवक कक्षत्तत लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक मीरा आदमाने (PI Meera Admane) अधिक तपास करीत आहेत.