दि. २४.०५.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली जिल्ह्यातील तीन एसडीपीओंचे स्थानांतरण...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात गडचिरोली जिल्ह्यातील तीन उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांचे स्थानांतरण सांगली जिल्ह्यातील मिरज येथे झाले आहे. त्यांच्या जागेवर पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त प्रशांत अमृतकर येणार आहेत. अहेरीचे एसडीपीओ अमोल ठाकूर यांची कराड येथे, तर धानोरा येथील एसडीपीओ स्वप्नील जाधव यांची बदली दौंड येथे झाली आहे. काल २३ मे रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात स्थानांतरण झालेल्या अधिकाऱ्यांना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला.